Viral Video: मनुष्यांप्रमाणे प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. त्यासाठी बऱ्याचदा त्यांनादेखील खूप मेहनत घ्यावी लागते, युक्ती लढवावी लागते. सोशल मीडियावर अशा प्रकारचे प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.जंगलातील अनेक व्हिडीओ नेहमीच आपल्या नजरेस पडतात, या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांबरोबर खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये हरणाची शिकार करण्यासाठी आलेल्या चित्त्याला हरण चकमा देताना दिसतोय. हरण आणि चित्त्याची ही जुगलबंदी सुरुवातीला मजेशीर वाटत असली तरीही पुढे असं काहीतरी होतं, जे पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल.
वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका जंगलामध्ये एक चित्ता शिकारीच्या शोधात असताना त्याची नजर हरणावर पडते. यावेळी हरणाची शिकार करण्यासाठी चित्ता वेगाने त्याचा पाठलाग करतो आणि हरणाला तावडीत पकडतो, परंतु चपळ हरीण चित्त्याच्या कचाट्यातून स्वतःला सोडवून घेते आणि दूर पळून जाते. यावेळी चित्ता पुन्हा पाठलाग करतो, पण पुन्हा हरीण चित्ता जवळ येताच पळून जाते. त्यानंतर चित्ता अधिक आक्रमक होतो आणि अधिक वेगाने धावून हरणाचा पाठलाग करून हरणाला आपल्या कचाट्यात पकडून त्याची शिकार करतो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ यूट्यूबवरील @bbcearth या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला हजारो व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यात कधी वाघाने, तर कधी चित्त्याने प्राण्यांची शिकार केली होती.