भूकंपानंतर समुद्राचे रौद्र रूप, इमारतींना धडकल्या त्सुनामीसारख्या भल्यामोठ्या लाटा; भयंकर VIDEO मागचे सत्य काय ते वाचा…

Bangkok Earthquake Viral Video : काही दिवसांपूर्वी म्यानमार आणि थायलंड बँकॉकमध्ये शुक्रवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भूकंपामुळे अनेक नागरिकांची हानी झाल्याचेही दिसून येत आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Fact check Of Bangkok Earthquake Video : काही दिवसांपूर्वी म्यानमार आणि थायलंड बँकॉकमध्ये शुक्रवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या भूकंपामुळे अनेक नागरिकांची हानी झाल्याचेही दिसून येत आहे. अनेक शेजारील देश हादरले आणि एक इमारत कोसळून किमान १८ जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. तर याचदरम्यान लाईटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सापडला, जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. व्हिडीओमध्ये इमारतींना धडकणाऱ्या त्सुनामीसारख्या मोठ्या लाटा दाखवल्या गेल्या होत्या. पण, आमच्या तपासादरम्यान वेगळेच सत्य समोर आले आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर लाभू राम गर्गने त्यांच्या (एक्स) अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. समुद्रातून भल्यामोठ्या लाटा इमारतींवर आदळताना दिसत आहेत. तसेच ‘बँकॉकमधील भूकंपाचा हृदयद्रावक व्हिडीओ #earthquake’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

मग आम्ही इनव्हिड टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आणि कीफ्रेम्स मिळवून तपास सुरू केला. आम्ही कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्या आणि आम्हाला इन्स्टाग्रामवर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला.

 

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा